आपला जिल्हा

वसमतमध्ये महायुतीची बैठक संपन्न: हिंगोली-परभणी विधानपरिषद निवडणुकीचा घेतला आढावा

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतमध्ये महायुतीची बैठक संपन्न: हिंगोली-परभणी विधानपरिषद निवडणुकीचा घेतला आढावा

वसमत (विशेष प्रतिनिधी):
हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वसमत येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवडणूक रणनीती आणि मतदानाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे, विधानपरिषदेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सईद खान आणि ज्येष्ठ नेते शिवदासजी बोडेवार प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्हाध्यक्ष पतंगे साहेब, चव्हाण साहेब यांच्यासह महायुतीतील इतर प्रमुख नेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
नगरसेवकांची मोठी उपस्थिती
या आढावा बैठकीला वसमतसह शेनगाव, कळमनुरी आणि हिंगोली येथील महायुतीतील सर्व आजी-माजी नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला दणदणीत बहुमताने विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत सर्वच घटकांनी व्यक्त केला.
विजयी होण्याचा विश्वास
बैठकीदरम्यान उपस्थित नेत्यांनी सर्व नगरसेवकांशी संवाद साधून मतदानाची प्रक्रिया आणि नियोजनाचा आढावा घेतला. आमदार राजू भैया नवघरे आणि संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी महायुतीची ताकद मोठी असून, सर्व घटक पक्षांच्या एकजुटीच्या जोरावर उमेदवार सईद खान यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
छाया: नागेश चव्हाण, वसमत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia