नुकसानीचा प्रश्न गंभीर, तुमचा राजू तुमच्याबरोबर खंबीर! आमदार राजू भैय्या नवघरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; केळी बागांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश
संपादक हरनामसिंग चव्हाण

नुकसानीचा प्रश्न गंभीर, तुमचा राजू तुमच्याबरोबर खंबीर! आमदार राजू भैय्या नवघरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; केळी बागांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश

वसमत CT NEWS संपादक: हरनामसिंग चव्हाण
वसमत तालुक्यातील बागल पार्डी व परिसरात काल झालेल्या अचानक अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ही बाब समजताच आमदार राजू भैय्या नवघरे यांनी तत्परता दाखवत थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला.
आमदार नवघरे यांनी केवळ सरकारी सोपस्कर न करता प्रत्यक्ष शेतात उतरून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी हे देखील उपस्थित होते.
अधिकारी वर्गाला कडक सूचना
पाहणी दरम्यान आमदार राजू भैय्या नवघरे यांनी उपस्थित महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही दिरंगाई न करता सरसकट आर्थिक मदत मिळण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व कार्यवाही युद्धपातळीवर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गेल्या वर्षीच्या ३३ लाखांच्या मदतीची आठवण
मागील वर्षी याच काळात बागल पार्डी परिसरातील सुमारे २१७ शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या वेळी देखील आमदार नवघरे यांनी शासन दरबारी सातत्याने आक्रमक पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल ३३ लाख रुपयांची मदत मंजूर करून आणली होती. याची आठवण करत त्यांनी याही वेळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही दिली.
“शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. केवळ कागदी घोडे न नाचवता मी आज थेट बांधावर जाऊन पाहणी केली आहे. माझ्या बळीराजाला लवकरात लवकर आणि योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी माझे शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.” — आमदार राजू भैय्या नवघरे
शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण:
संकटाच्या काळात आमदार महोदयांनी स्वतः बांधावर येत दिलेल्या या धीरामुळे बागल पार्डी परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये काहीसा दिलासा पाहायला मिळत आहे. आता प्रशासनाकडून पंचनामे कधी पूर्ण होतात आणि मदत कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



