अर्थकारणआपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल विभागात मोठी खळबळ! गरिबांच्या हक्काचा रस्ता अडवणार्‍या अधिकार्‍यांची आता खैर नाही; थेट महसूल मंत्र्यांच्या पत्राने हिंगोली प्रशासन हादरले!

विशेष प्रतिनिधी

महसूल विभागात मोठी खळबळ! गरिबांच्या हक्काचा रस्ता अडवणार्‍या अधिकार्‍यांची आता खैर नाही; थेट महसूल मंत्र्यांच्या पत्राने हिंगोली प्रशासन हादरले!

…तर थेट निलंबन! मौजे कन्हेरगांव रस्ता प्रकरणी गिरगांवचे सर्कल अन् तलाठी रडारवर; जिल्हाधिकारी कार्यालयाचा विनाविलंब अहवाल सादर करण्याचा आदेश.

हिंगोली / वसमत:
शासकीय आदेशांचे सर्रास उल्लंघन करणे आणि गरीब, मागासवर्गीय शेतकर्‍यांची अडवणूक करणे आता गिरगांवचे मंडळ अधिकारी (सर्कल) आणि तलाठ्याला चांगलेच महागात पडणार आहे. मौजे कन्हेरगांव (ता. वसमत) येथील गट क्र. १२३ मधील शेतकर्‍यांच्या हक्काचा वहिवाटीचा रस्ता बेकायदेशीररित्या अडवल्याप्रकरणी या दोन्ही अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशा मागणीचे खळबळजनक पत्र हिंगोलीचे अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी उपविभागीय अधिकार्‍यांना पाठवून तात्काळ (विनाविलंब) कायदेशीर कारवाईचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!