वसमत तालुक्यातील मोहगाव या गावचे माजी सरपंच तथा एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून अशी ओळख असलेले राजू मारोतराव वांडे हे तिरुपती दर्शन साठी त्यांच्या मित्रांसोबत जात असताना रेल्वेतून पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
राजू वांडे हे मित्रांसोबत तिरुपतीला जात असताना दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चाकूर पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेले आढळले यावेळी रेल्वे पोलिसांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
राजू वांडे हे एक सामाजिक कार्यकर्ते असून मोहगाव या गावचे ते माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहे. वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात यांचा नेहमी सहभाग असायचा त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी, पत्नी, आई-वडील व तीन भाऊ असा मोठा परिवार त्यांचा असून त्यांच्यावर काल दिनांक 13 सप्टेंबर रोजी मोहगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.