वसमत शहरातुन जाणाऱ्या नॅशनल हायवे या हायवे दरम्यान शहरातील रहदारीचे ठिकाण असलेल्या गवळी मारुती मंदिर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय आहे याच कार्यालयाच्या बाहेर एक मोठा खड्डा असल्याने या खड्ड्यांमधून जाताना अनेक वाहनधारकांचा अपघात होऊन जखमे होत आहेत .तसेच या खड्ड्यात पाणी साचल्याने खड्डा दिसत नसल्याने अनेक विद्यार्थी या खड्ड्यात वाहने अडकून पडत आहेत या ठिकाणाहून अवजड वाहने या ठिकाणाहून जात असतात दुर्दैवाने एखादी अप्रिय घटना घडू नये यासाठी लक्ष देणे गरजेचे असताना सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय याच ठिकाणी आहे. उपअभियंता यांना हा खड्डा दिसत नाही हा शोधाचा विषय आहे तसेच रस्त्याचे काम सुरू असलेल्या गुत्तेदारास हा खड्डा दिसत नाही त्यामुळे वसमत येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी या खड्ड्यामध्ये बेशरमाचे झाड लावून गांधीगिरी केली आहे तसेच येत्या दोन दिवसात हा खड्डा न बुजवल्यास सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांना बेशरमाच्या फुलाचा हार घालण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी दिला आहे यामुळे शहरातील अनेक ठिकाणावर मुख्य रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर बुजवावे अन्यथा उप अभियंता यांना बेशरमाच्या फुलाचा हार घालण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळेस शिवसेना तालुकाप्रमुख डाॅ धोंडीराम पार्डीकर,शहर प्रमुख काशीनाथ भोसले,नगरसेवक गटनेते दिपक हळवे पाटील ,संजय टाक,कट्टेकर,मुटकुळे,भडके आदी उपस्थित होते.