खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यतत्पर आरोग्य सेवेतुन मिळाली आडीच लाखाची मदत
वसमत/ रामु चव्हाण
हिंगोली लोकसभा मतदार संघातील सामान्य नागरीकांचे कुठलेही काम थांबुनये. यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उभारले आहे. याच संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे घट्ट जाळे विणले गेले आहे. आरोग्य तत्पर सेवेच्या जोरावर खासदार हेमंत पाटील यांच्या मदतीने साडेतीन वर्षाच्या एका चिमुकलीच्या गंभीर आजारावर उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून आडीच लाखाची आरोग्य मदत मिळाल्याने तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आली. चिमुकली यशस्वी उपचार घेऊन सुखरुप घरी परतल्याने आईवडीलांसह नातेवाईकांचा देखील आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पोस्ट नर्सी नामदेव राहणार कडती येथील पोघे कुटुंबात आजच्या साडेतीन वर्षापूर्वी एका गोंडस मुलीचा जन्म झाला. सहा जणांच्या या रोजमजूरदार कुटुंबात नवीन पाहुण्याच्या आगमनाने कुटुंबात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. परंतू जेव्हा या चिमुकलीस गंभीर आजाराची लागण झाल्याचे समजले तेव्हा मात्र या कुटुंबियांचा आनंद क्षण भंगुर ठरते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे घरातील वातावरण धिरगंभीर झाले होते.
परंतू यातही खासदार हेमंत पाटील यांच्यामदतीने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीच्या या आजारावर उपचारासाठी शक्यती मदत मिळते. असा अनेकांचा अनुभव बघता पोघे कुटुंबातील दसस्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या हिंगोली शहरातील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधुन खासदार हेमंत पाटील यांच्याशी संवाद साधला आणि खासदार हेमंत पाटील यांनी अनिल पोघे कुटुंबियांना आरोग्यासाठी सर्वती मदत मिळवून देण्याचे अश्वासन दिले.
संपर्क कार्यालयातील आरोग्य दूतामार्फत चिमुकलीच्या वडीलांकडुन आवश्यक त्या कागदपत्राची जमवा जमव करुन पंतप्रधान सहाय्यता मदत निधीसाठी पाठवली. खासदार हेमंत पाटील यांची कार्यतत्पर्तेची दखल घेत पंतप्रधान सहाय्यता निधीतून चिमुकलीचे वय आणि आजार बघता तिच्यावर उपचारासाठी तातडीने आडीच लाख रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली. यामुळेच या चिमुकलीवर डॉक्टरांना यशस्वी उपचार करण्यात यश आले. यशस्वी उपचाराने आज ही चिमुकली अतिशय गंभीर आजारावर मात करुन सुखरुप घरी पोहचली आहे.
खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यतत्पर्तेमुळेच पोघे कुटुंबियांना पुन्हा आनंद परत मिळाल्याने पोघे कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत.