हिंदू संस्कृती व धर्म जागृती या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी वसमत येथे भव्य हिंदू स्नेह मिलन,दिवाळी फराळ,श्री संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
वसमत शहरातील वेंकटेश्वरा मंगल कार्यालय ,बहिर्जी कॉलेज रोड येथे आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी 6-00 वाजता हिंदुस्नेह मिलन व दिवाळी फराळ तसेच संत संमेलनाच्या आयोजन करण्यात आले असून यावेळी हिंदू धर्मातील संत महंत यांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. हिंदू संस्कृती व धर्म जागृती या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे यासाठी जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आव्हान आप हम और श्री राम जन्मोत्सव समिती वसमत यांच्या वतीने करण्यात आले आहे.