डॉ. राम चव्हाण ठाकरे सेनेचेच निष्ठावंत उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्तीसाठी शिवसैनिकांची मागणी

डॉ. राम चव्हाण ठाकरे सेनेचेच निष्ठावंत उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्तीसाठी शिवसैनिकांची मागणी
नांदेड, (प्रतिनिधी) शिवसेनेचे माजी नांदेड उत्तर विभाग प्रमुख, १९८६ पासूनचे निष्ठावंत शिवसैनिक डॉ. राम चव्हाण यांनी बंडखोरीच्या महानाट्यनंतरही आपल्या
‘निष्ठा’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मूळ शिवसेनेशी कायम ठेवल्या आहेत. खासदार हेमंत पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही कार्य केलेल्या उच्चविद्याविभूषित डॉ. राम चव्हाण यांनी तब्बल तीन दशकांपेक्षा अधिक काळ शिवसेनेचे निष्ठेने कार्य केले आहे. ओबीसी समाजाचा चेहरा असणाऱ्या डॉ. राम चव्हाण यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात पुन्हा सक्रियतेने कार्य करण्याची ऊर्जा देण्यासाठी नांदेड उत्तर उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
डॉ. राम चव्हाण हे नांदेड जिल्ह्यात कट्टर आणि निस्वार्थ, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सुपरिचित आहेत. नांदेड जिल्ह्यातील आजी-माजी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अंगीकृत संघटना, प्रशासन, पत्रकार तसेच सामान्य शिवसैनिकांशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. नांदेड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व विभाग व प्रभागात त्यांचा चाहता वर्ग व्यापक प्रमाणावर आहे.
आगामी काळात शिवसैनिकांची वज्रमुठ भक्कम करण्याच्या दृष्टीने डॉ. राम चव्हाण यांच्याकडे उपजिल्हाप्रमुख पदाचा भार सोपवण्याची शिवसेनेच्या ओबीसी प्रवर्गातून मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ निरूरकर आणि शिवसेनेचे सचिव तथा शिवसेना नेते खा. अनिल भैय्या देसाई, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्याकडे शिवसेनेतून व राम चव्हाण यांच्याकडून आग्रही मागणी होत आहे. नाट्यशास्त्रात विद्यावाचस्पती पीएच.डी. पदवी प्राप्त करणारे डॉ. राम चव्हाण यांनीही शिवसेनेत नवा जोम आणि जोश निर्माण करण्यासाठी यापुढे अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले आहेत.