वसमत निवडणुक विभागाने पकडले 89 लाख रू च्या वर रोकड
वसमत / रामु चव्हाण
92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी मतदान दि.20.11.2024 रोजी होणार असून त्यासाठी SST पथकांची नियुक्ती केली आहे. आज दि.17.11.2024 रोजी सकाळी-8.15 वा. मौ. चिखलीफाटा ता. वसमत येथे नियुक्त केलेल्या SST पथकाकडुन मुंबई वरुन नांदेडकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस क्रमांक-MH-23AU-7703 ची SST पथकाडुन तपासणी करण्यात आली असता सदर वाहनातुन रक्कम रु.8978500/- SST पथक व पोलीस विभागाच्या संयुक्त कार्यवाहीमध्ये रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर कार्यवाहीमध्ये नोडल अधिकारी श्री.जी.बी. पवार, सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हटटा श्री. जाधव, हे होते. सदर रक्कम उपकोषागार कार्यालय वसमत येथे जमा करण्यात आली आहे व पुढील कायदेशीर कार्यवाही अनुसरण्यात येत आहे.
सदर कार्यवाही मा. जिल्हाधिकारी हिंगोली अभिनव गोयल, मा. पोलीस अधिक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे, निवडणुक निर्णय अधिकारी 92 वसमत विधानसभा विकास माने, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी वसमत श्रीमती. शारदा दळवी, आचार संहीता प्रमुख सुनिल अंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली SST पथकाकडून करण्यात आली असल्याचे माहीती
विकास माने उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 92-वसमत विधानसभा मतदारसंघ यानी दिली आहे.