आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणराजकीय
वसमत तालुक्यातील दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव वाटप करणार – आमदार राजु भैय्या नवघरे
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
आमदार राजुभैय्या नवघरे यांचा सामाजिक उपक्रम
सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नविन दिल्ली यांच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागा अंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम-कानपूर, जिल्हा प्रशासन व राजुभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने वसमत विधानसभा मतदार संघातील चारही प्रवर्गातील दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी दि.२१ व २२ एप्रिल २०२२ रोजी वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ या दरम्यान मयुर मंगल कार्यालय,कारखाना रोड वसमत येथे आयोजित करण्यात आले आहे…..
वसमत विधानसभा मतदार संघातील दिव्यांगांनी शिबीरास येण्या पुर्वी आपली नाव नोंदणी आपण राहत असलेल्या भागातील आपले सरकार(कॉमन सर्विस सेंटर(CSC)) येथे नोंदणी करून तो नोंदणी क्रमांक व आपले दिव्यांग प्रमाणपत्र,आधार कार्ड व रेशन कार्ड किंवा उत्पन्नाच्या दाखल्याची झेरॉक्स व पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणायचा आहे .
या तपासणी शिबीराचत तपासणी झालेल्या दिव्यांगाना दोन ते तीन महिन्यांत सदरचे साहित्य वाटप करण्यात येईल यात अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांना मोटाराईज ट्राय सायकल,तिनचाकी सायकल,व्हिलचेअर, सर्व प्रकारच्या स्टिक, कुबडी जोड, अत्याधुनिक प्रकारचे जयपूर फूट,कॅलीफर,तर कर्णबधीर प्रवर्गातील दिव्यांगांना डिजीटल श्रवण यंत्र व बॅटरी तर अंध प्रवर्गातील दिव्यांगांना शालेय व महाविद्यालयीन युवकांसाठी स्मार्ट फोन, स्मार्ट केन,डेजी पेल्यर,ब्रेल किट तर मतिमंद प्रवर्गातील ४ ते १८ वर्षे याच वयोगटातील दिव्यांगांना एम.आर.किट,व्हिलचेअर,सि.पी.चेअर इत्यादी साहित्य मोफत वाटपासाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम-कानपूर चे तज्ञ डॉक्टरांच्या या तपासणी व मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे….तरी वसमत विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त दिव्यांग बंधू – भगिनींनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार चंद्रकांत उर्फ राजुभैय्या नवघरे
यानी केले आहे