वसमत तालुक्यात सुरू असलेली अवैध रेती वाहतूक करणारे वाळूचे टिपर 11 नोव्हेंबर रोजी रात्री 8-45 वा सुमारास पकडले.
वसमत शहरातील दादरा कॅनॉल परिसरजवळ एक वाळूचे टिपर क्र.MH 22 AA 0290 उभे होतो यावेळेस शहरात शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पेट्रोलिंग करत असताना पोलीसांनी सदरील टिपर चालकाची विचारपूस केली असता टिपर चालकाने उडवा उडवीची उतरे दिली.तसेच सदरील टिपर मध्ये वाळूची वाहतूक परवाना पावती ताळमेळही बसत नसल्याचे पोलिसाच्या लक्षात आले.यावेळेस सदरील टिपर शहर पोलीसांनी ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आनुन या प्रकरणात तीन ब्रास रेती अंदाजे किंमत अठरा हजार रू. रेती शासनाचा महसूल बुडविला म्हणून टिपर चालकां विरूध्द पोलीस कर्मचारी दिलीप पोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.
पण टिपर चालकावर गुन्हा दाखल झाला तरी हा टिपर मालक कोण,वाळू कुठून आली आणि कुठ जात होती याचा शोध घेऊन संबंधित टिपर मालकावर गुन्हा दाखल होईल का,टिपर मालकाचा शोध पोलीस घेत असून..टिपर मालकावर गुन्हा दाखल होईल का हे आता पहावे लागणार आहे.
सदरील कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दिलीप पोले व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.