वसमत शहरासह तालुक्यात गेली दोन वर्षांपासून बंद असलेले शाळा महाविद्यालय खाजगी कोचिंग क्लासेस यांची नेमकी सुरुवात झाल्यानंतर सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत शाळेला जाणाऱ्या विद्यार्थिनी तसेच खेडेगावातून वसमत येथे येणाऱ्या मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सध्या वसमत शहरात वाढल्याचे पहावयास मिळत आहे.
वसमत शहरातील बसस्थानक परिसरात तर रोडरोमिओंचा उच्छाद नेहमी सुरू असतो शाळेत जाणाऱ्या मुलींची टिंगलटवाळी करणे मोटरसायकल घेऊन त्यांना कट मारणे असे प्रकार शहरात पहावयास मिळत आहे. वसमत शहरातील बहिर्जी महाविद्यालय ,योगानंद महाविद्यालय केंब्रिज महाविद्यालय तसेच सर्व शाळेच्या रस्त्यावर सर्रास रोडरोमिओंचा टवाळकी बसलेले पहावयास मिळत असून यामुळे विद्यार्थिनींना जाता-येताना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातच आज वसमत शहरातील पोलीस स्टेशन जवळ एका विद्यार्थिनीला एका रोड रोमिओने छेडछाड केली असता सदरील विद्यार्थिनी वसमत शहर पोलीस स्थानका जवळ रडत उभी असताना वसमत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सिताराम मान्येवार व पत्रकार नासर पठाण , ज्यूनेद चाऊस यांनी सदर विद्यार्थ्यीनीची विचारपूस केली असता रोड रोमिओने छेडछाड केल्याचे तिने सांगितली
यावेळेस उपनगराध्यक्ष सिताराम मान्येवार,ज्युनेद चाऊस यांच्यासह नागरिकांनी सदरील रोडरोमिओला आणून त्याची यथेच्छ धुलाई केली.
यामुळे वसमत शहरात छेडछाडीचे प्रकार वाढले असून वसमत शहर पोलिसांनी साध्या गणवेशामध्ये सकाळी पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी उपनगराध्यक्ष सिताराम मान्येवार यांनी केली आहे यामुळे वसमत शहरात दामिनी पथक चिडीमार पथक लवकरात लवकर कार्यान्वित करून सदरील छेडछाड प्रकार थांबवावे अशी मागणी उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार यांनी केली आहे.