आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण
लाल बहादूर शास्त्री विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा

वसमत/ रामु चव्हाण
वसमत येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस म्हणजेच ‘बालदिन’मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पंडित नेहरू यांच्याविषयी माहिती शाळेचे अध्यक्ष श्री.संदिप चव्हाण सर यांनी सांगितली.
तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले होते . विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला.

या कार्यक्रमाला इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री आसाराम दुधाटे सर, सेमी माध्यमाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री गोविंद गडगिळे सर समन्वयक श्री. संदीप चाटोरिकर सर सर्व शिक्षक व प्री – प्रायमरी विभागाच्या प्रमुख दुर्गाताई ढेपे मँडम व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिशिर सर व सौ. नेहा शातलवार मँडम यांनी केले सर्वांनी विद्यार्थ्यांना ‘बालदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. व बालदिन मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.