बहिण भावाचं नातं काय असतं भावाच्या पाठीवर पाय देऊन आलेल्या बहिणीने भावाच्या मृतदेहावरच आपला प्राण सोडल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बहीण भावाचा एकाच दिवशी अंत्यसंस्कार ही करण्यात आले.
वसमत तालुक्यातील कोर्टा या गावात राहणाऱ्या मथुराबाई संभाजी बोरकर यांचं माहेर अहिल्यादेवी नगर अर्धापूर येथील साखरे कुटुंबातील आहेत. त्यांचा विवाह वसमत तालुक्यातील कोर्टा येथील संभाजी नारायणराव बोरकर यांच्याशी झाला होता त्यांचा मोठा भाऊ नामदेव साखरे हे गेली अनेक महिन्यांपासून आजारी होते आजार जास्त बळवल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती त्यांच्या राहत्या घरी दिनांक 14 मार्च रोजी रात्री निधन झाले हे निधनाची वार्ता त्यांच्या सर्व नातेवाईकांसह त्यांची बहीण मथुराबाई संभाजी बोरकर वय वर्ष 80 यांना देण्यात आली भावाचा मृत्यू झाल्याचे कळताच मथुराबाई या अंत्यसंस्कारासाठी अर्धापूर येथे दिनांक 15 मार्च रोजी सकाळी पोहोचल्या आपल्या लाडक्या भावाचे अंत्यदर्शन साठी मथुराबाई सकाळी नऊ वाजता सुमारास पोहोचल्या यावेळी भावाचा मृतदेह पाहत असताना क्षणात धक्का बसून त्यांच्या त्याच ठिकाणी त्यांनी आपला प्राण सोडला. शहरातील ग्रामीण रुग्णालयात त्याना तात्काळ दाखल केले पण तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना मृत घोषित केले. भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या बहिणीवर काळाने घाला घातला यावेळी उपस्थित त्यांनी बहीण भावाचं नातं दोघांनीही ज्या ठिकाणी लहानपण घालवलं त्याच ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला.मथुराबाई काही दिवसांपूर्वीच आजारी भावाला भेटण्यासाठी येऊन गेल्या होत्या.भावाच्या जाण्याचे दुखः सहन न झाल्याने माहेरीच मथुराबाई यानी प्राण सोडला दोघांच्या निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी माहेरच्या वतीने मथुराबाई यांना साडीचोळी आदर सन्मान करत त्यांचा मृतदेह वसमत तालुक्यातील कोर्टा येथे पाठवण्यात आला कोर्टा येथे त्यांच्यावर 15 मार्च रोजी सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले मथुराबाई यांच्या पश्चात पती एक मुलगा दोन मुली असा परिवार असून त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.