टाकळगाव रोडवर झालेल्या भीषण अपघातात दोन सख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पिंपरी महिपाल येथील राजू शिवाजी खिलारे यांची बहीण विरेगाव तालुका वसमत येथे राहत असल्याने बहीण व भाचे यांना घेऊन राजू खिलारे वय वर्षे 24 राहणार पिंपरी महिपाल हे आज सायंकाळी अंदाजे आठ वाजण्याच्या सुमारास विरेगाव येथून पिंपरी महिपाल कडे जात असताना टाकळगाव रोडवर टाकळगाव येथून वसमत कडे येणाऱ्या टाटा एस मॅजिक पिकप क्रमांक MH 22 AA 1630 यांनी मोटरसायकल क्रमांक MH 26 U 2957 ला समोरुन जोरदार धडक दिली.
यामध्ये आदर्श अरविंद सुरय्या वय वर्ष 8 व कीर्ती अरविंद सुरय्या वय वर्ष 9 या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर राजू खिलारे वय 24 व आरती अरविंद सुर्य वय 16 वर्ष हे दोघे जखमी झाले असून त्यातील राजू खिलारे यांना नांदेड येथे रेफर करण्यात आल्याची माहिती रुग्णालय मार्फत देण्यात आली आहे.
तर यावेळी घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांनी भेट दिली आहे. सदरील मॅजिक पिकप वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आणला असल्याची प्राथमिक माहिती आहे.