आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वसमत कडे रवाना
रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण
वसमतनगर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा *पंचधातु* पासुन बनविलेल्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे काम पुर्ण झाले असुन आज दि.९ ऑक्टोबर रोजी महाराजांचा ऐतिहासिक पुतळा *जयपुर* हुन वसमत कडे निघाला आहे.
वसमत वासियांची बऱ्याच दिवसांपासून महाराजाचा पुतळा कधी बसणार ही प्रतिक्षा संपली असुन आज पासून जवळपास ३ दिवसांनी महाराजाच्या पुतळ्याचे वसमत येथे आगमन होणार आहे.
शासनाच्या “कला संचालनालय, मुंबई”, “मुख्य वास्तुशास्त्र विभाग, मुंबई”, “पोलीस अधिक्षक कार्यालय, हिंगोली” तसेच “वसमत नगर परिषद” च्या पुतळा बसविण्यासंबंधीच्या आवश्यक सर्व परवानग्या घेतल्या आहेत व उर्वरित आवश्यक परवानग्या घेऊन नियमानुसार पुतळ्याचे भव्य स्वरुपात अनावरण करण्यात येणार आहे अशी माहिती पुतळा समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मंगळवारी किंवा बुधवारी वसमत येथे दाखल होणार असुन वसमत नगर परिषद हद्दीवर महाराजांचे जल्लोषात स्वागत करुन भव्य मिरवणुक काढण्यात येणार असुन या कार्यक्रमासाठी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे अशी विनंती पुतळा समितीचे सचिव सुनिलभाऊ काळे यांनी केली आहे.