ताज्या घडामोडी
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतून 7 अर्ज अवैध तर 109 अर्ज वैध

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतून 7 अर्ज अवैध तर 109 अर्ज वैध
वसमत / रामु चव्हाण
कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या 23 नोव्हेंबर च्या दिवशी दाखल केलेल्या 116 उमेदवारी अर्जांपैकी 7 उमेदवारी अर्ज हे अवैध ठरलेले आहेत तर 109 अर्ज हे वैध ठरवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डुकरे, दुधमल यांनी दिली आहे
यामध्ये सहकारी इतर मागासवर्ग प्रवर्गातून 4
सहकारी विमुक्त जाती विमुक्त जमाती विमुक्त मागास प्रवर्गातून -1
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीतून 2
असे एकुण 7 अर्ज बाद झाले.