आरोग्य व शिक्षणसामाजिक

साईप्रसाद भास्कळची अमेरिकेतील ऑनलाइन चॅम्पियनशिपसाठी निवड

रामु चव्हाण

इंटरनॅशनल अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये साईप्रसाद सुभाष भास्कळला सर्वोत्कृष्ट प्रथम पुरस्कार
—————–
साईप्रसाद भास्कळची अमेरिकेतील ऑनलाइन चॅम्पियनशिपसाठी निवड
—————-

बीड / रामु चव्हाण

 

बाल मनाच्या बुद्धीचा, सुप्तगुणांचा विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. अबॅकस स्टडी केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर, अबॅकस आणि वैदिक मॅथ चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप पारितोषिक वितरण 24 फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये झालेले असून एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. बीडच्या अबॅकस प्रशिक्षण केंद्राच्या आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट ऐतिहासिक क्रमांक मिळविले आहेत. जागतिक स्तरावरील ऑनलाइन चॅम्पियनशिप आयसीमास अबॅकस दिल्ली, अरिस्तो किड्स हैदराबाद, ओरिएंटल अबॅकस यु एस ए यांच्या सहकार्याने आणि समन्वयाने झालेला असून त्यामध्ये भारतासह युनायटेड किंग्डम, यु एस ए, सिंगापूर अनेक देशातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. साईप्रसाद सुभाष भास्कळने पाच मिनिटांमध्ये शंभर गणित सोडवून 97% मिळवून जागतिक स्तरावर प्रथम येण्याचा अविस्मरणीय यशस्विता मिळवली असून त्याला प्रथम क्रमांकाचे वुडन सायटेशन ट्रॉफी, मेडल पुरस्कार देण्यात आलेला आहे.  साईप्रसाद भास्कळने मिळवलेल्या यशामध्ये आई-वडिलांचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले आहे. साईप्रसाद भास्कळने मिळवलेल्या यशाचे अभिनंदन समाजातील सर्व स्तरांमधून होत असून चॅम्पियनशिपची आयोजक ओरिसाचे उज्वल पांडा, दिल्लीचे श्रीनिवासन, आयसीमस अबॅकस मॅनेजिंग डायरेक्टर एम एम अग्रवाल ,अबॅकस स्टडी सेंटरचे प्रमुख डॉ. घोडके एस ए तसेच साईप्रसाद भास्कळच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी त्याचेअभिनंदन केले आहे.प्रथम लेव्हल पासूनच साईप्रसाद भास्कळ सतत प्रथम क्रमांकाने यश मिळवता आलेला आहे. अमेरिकेतील ऑनलाईन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप ऑगस्ट 2022 मध्ये होणाऱ्या यु एस ए आणि सिंगापूर आयोजित एम एम गो आंतरराष्ट्रीय मॅथ करिता त्याची निवड झालेली आहे असे मास्टर अबॅकस ट्रेनर डॉ. एस. ए. घोडके यांनी सांगितले. या यशाबददल माजी सभापती पंचायत समिती गेवराईचे श्री . पांडूरंग कोळेकर माजी सरपंच श्री . सोमेश्वर गचांडे सिरसमार्ग चे सरपंच श्री अशोक परदेशी कुप्पा गावचे सरपंच बाबा भास्कळ दै . लोकाशाचे संपादक श्री . उत्तमजी हजारे पत्रकार सुहास पवळ तुळजाई ग्रुपचे सर्व सदस्य आदिंनी साईप्रसादचे कौतुक केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!