वसमत/ रामु चव्हाण
आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ वार शनिवार रोजी लाल बहादुर शास्त्री विद्यालयात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचे काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बरेच विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांचे काव्य वाचन घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या सौ. अनुराधा चव्हाण मॅडम या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गोविंद गडगिळे सर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कालिदास कौसडीकर सर यांनी केले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी लाल बहादूर शास्त्री विद्यालय ही शाळा या शाळेने एक आगळावेगळा उपक्रम राबवुन विद्यार्थ्यां मधील साहित्यिक कवी कवयित्री यांचे काव्यवाचन हा उपक्रम राबवला यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी गितेश मामिडवार,गौरव सोळंके, आर्या बनसोडे, समिक्षा मुळे, मयुरेश पोफळे,आर्वि सवंडकर, प्राची हरणे, वेदिका सुर्यवंशी, सुहानी कोंडेकर, प्रियंका सुर्यवंशी,समर्थ बुलबुले, श्रावणी आले, ऋषभ सोनी,अनुराग खराटे,आयुष कुंटे, प्राजक्ता पारखे, संस्कृती डांगे काव्यवाचना द्वारे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या… याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थीनींनी “माय मराठी गळ्यात घाली लोककलेचा देणं हे उत्कृष्ट नृत्य सादर केले त्यामध्ये सहभागी विद्यार्थिनी श्रुती लोंढे,प्रियंका सुर्यवंशी,मयुरी तर्फे,पुर्वा सिरसुलवार, श्रेया नवघरे,आदिती गोरे,दिपीका काळे,प्रणाली शेटेवाड यांना ढेपे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.संगित शिक्षक गंगाधर खैरे सर यांचा संचश्रुती भेंडे,सत्यम बेले,आर्या नरवाडे, पृथ्वीराज यशवंते,स्वरांजली रिठे,आराध्या मामिडवार,संजिवनी गिते यांनी गिते गायन केले.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कविता व कवी कुसुमाग्रज यांच्या माहीतीचे व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भित्तीपत्रक विद्यार्थ्यांनी तयार केले होते त्याचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अध्यक्ष श्री.संदिप चव्हाण सर,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.अनुराधा चव्हाण मँडम, सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा गोंगे मँडम, गोविंद गडगिळे सर, गायकवाड सर, संतोष छपरे सर, विनायक बारिकी सर, कुणाल बोबडे सर, रमेश आझादे सर,विष्णूवर्धन गौंड सर, शेख समिर सर, सचिन लाटकर सर,शेख रियाज सर,विलास जोगदंड सर,कल्याण ढगे सर, कालिदास कौसडिकर सर,राजकुमार निरजापाटिल सर,प्रमोद डोंबे सर, श्रवन कदम सर, प्रकाश कांबळे सर, संभाजी देशमाने सर, सतिश चव्हाण सर, मिरा खराटे मँडम, सोनाली अग्रवाल मँडम, नेहा शातलवार मँडम, वैशाली मोगेकर मॅडम,सरिता अग्रवाल मॅडम, अरूणा मुंजाळ मँडम, दुर्गाताई ढेपे मँडम,अंकिता हरबयासी मँडम, सुचिता कान्हे मँडम, मेघारानी चंदेल मँडम, गंगासागर पवार मँडम, शामा गरूडकर मँडम, लता खांडेगांवकर मँडम, भाग्यश्री काटे मँडम आदिंनी सहकार्य केले.