राष्ट्रीय काव्यांगण लेखनीचे साहित्य मंच तथा सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. सन २०२१ यावर्षी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील शिक्षिका सौ.दुर्गा संतोष डांगे, यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदर पुरस्कारासाठी आँनलाईन वेबसाईट द्वारे माहिती सादर करण्यात आली. दि.१०आक्टोबर २०२१ रोजी गुगल मिट द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध कवी डाँ. सुनील पवार, राष्ट्रीय सल्लागार डाँ. निरज अत्राम, राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक राजू पाडेकर सर, उपाध्यक्ष सौ.प्रांजली काळबेंडे मँडम, महासचिव प्रा. सुहानंद ढोक आदी मान्यवर उपस्थित होते. वसमत येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील शिक्षिका सौ.दुर्गा संतोष डांगे यांना यावेळी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ आँनलाईन गुगल मिटद्वारे प्रदान करण्यात आला.त्यांच्या या निवडीबद्दल लालबहादूर शास्री विद्यालयातील शिक्षक वृंद व राष्ट्रीय काव्यांगण लेखनीचे साहित्य मंच तथा सामाजिक संघटना हिंगोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.