रा. काँ. पार्टी वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीपदादा सोळुंके यांनी वसमत येथील आॕड. राजा कदम यांची रा. काँ. पार्टी वक्ता प्रशिक्षण विभागाच्या हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. रा. काँ. पार्टीचे ज्येष्ठ नेते व सहकार महर्षी जयप्रकाशजी दांडेगावकर , आ. चंद्रकांत (राजूभैय्या ) नवघरे व रा. काँ.पार्टी जिल्हाध्यक्ष दिलिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. दि. २३/१०/२०२१ रोजी औरंगाबाद येथे प्रदीपदादा सोळंके यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. यात रा. काँ.पार्टी वक्ता प्रशिक्षण विभागाचा परभणी जिल्हाध्यक्ष तथा नांदेड /हिंगोली जिल्हा प्रभारी संदिप माटेगावकर यांचे मोलाचे योगदान आहे. या निवडीबद्दल ॲड. राजा कदम यांचे जयप्रकाशजी दांडेगावकर , आ. राजूभैया नवघरे , माजी आ. पंडीतराव देशमुख , बालुमामा ढोरे , तानाजी बेंडे , जिजामामा हरणे , त्र्यंबक कदम , गजानन ढोरे , सौरव जाधव , प्रशांत शिंदे , शिवाजी ढोरे आदींनी आभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.