वसमत तालुक्याला पुरातन इतिहासाची परंपरा आहे त्याचप्रमाणे तालुक्यात विविध ठिकाणी देवी-देवतांचे मंदिरे असल्याने अनेक जागृत मंदिरे वसमतमध्ये वसमत तालुका परिसरामध्ये पहावयास मिळत आहे यात आंबा येथील आंबा मातेचे मंदिर येथे आहे.तसेच कुरूंदा येथील टोकाई माता चे मंदिर व जवळपास कुर्मा देवीचे मंदिर सुद्धा वसमत तालुक्यात आहे.
त्याचप्रमाणे वसमत शहरात सुद्धा माहूरच्या रेणुका मातेचे पिठ ब्राह्मण गल्लीत असून या ठिकाणी रेणुका मातेचे मंदिर सुद्धा आहे
या सर्व ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये भक्तांची मोठी रेलचेल दर्शनासाठी पहावयास मिळत आहे गेली अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे सुरू झाल्यानंतर या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहावयास मिळत आहे तर अशाच रेणुकामातेचे नवरात्र मध्ये स्थापना करण्यासाठी वसमत शहरातील शुक्रवार पेठ वसमत येथील रहिवासी मूर्तीकार प्रभू बालचंद्र बगळे यांनी त्यांच्या कल्पनेतून गाईचे पंचगौव्य (शेण, गोमुत्र, तुप, दूध, दही, ),मध, काळीमाती आदी पासून नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून माहुरच्या रेणुका मातेची मुर्ती अतिशय सुंदर,देखणी आणि मन आकर्षित करणारी मुर्ती बनवली असून शुक्रवार पेठेतील श्री दुर्गेश्वरी नवरात्र महोत्सव यांच्या अंतर्गत साधु महाराज मठ येथे मुर्ती स्थापन करण्यात आली आहे.
माहूरच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेली रेणुकामातेचे साक्षात हुबेहूब मूर्ती गायीच्या पंचगव्य पासून बनवले असे पहिल्यांदाच जिल्हा भरा मध्ये पहावयास मिळत आहे ही साक्षात रेणुकामाता प्रगट केल्याचे इथले भाविक सांगत असून भाविक भक्त ही मुर्ती पाहण्यासाठी मोठ्या श्रद्धेने येत आहेत,, अशावेळी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता मंडळाकडून सोशल डिस्टेंशिंग,सेनिटायझर,मास्क,अथवा रुमाल वापरून येणाऱ्या भाविकांना देखील हे नियम अनिवार्य केले आहेत.
प्रभू बगळे हे मूर्तीकार ते अनेक प्रकारच्या मुर्ती बनवतात परंतु यावर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त त्यांनी आगळी वेगळी कल्पना करून पंचगौव्यापासुन तुळजाभवानी मातेची मुर्ती बनवली, ही मुर्ती पर्यावरण पूरक असून विसर्जन करणे सुद्धा सोपे आहे हि मुर्ती शेणा मातीची बनवली असल्याने शेतात विसर्जन केले असता खत म्हणून उपयोग होऊ शकतो यामुळे पर्यावरणाला अनुकूल अशी ही मुर्ती बनवण्यासाठी बराच कालावधी लागला असून सदरील मुर्ती बनवण्यासाठी वसमत येथील वेदमुर्ती अमोघ विनायक महाराज, उमेश गुरु यांनी मार्गदर्शन केले अशी माहिती मूर्तीकार प्रभू बगळे यांनी दिली आहे.