आपला जिल्हामहाराष्ट्र

वसमतच्या सार्वजनिक शिवजयंती जन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी तुषार जाधव पाटील यांची निवड

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी वसमत येथील सप्तगिरी सिटी येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली यावर्षीचा सार्वजनिक शिवजन्मोत्सव हा वेगवेगळे उपक्रम राबवून साजरा करण्याचे बैठकीत ठरले
अतिशय साध्या पद्धतीने शिवभक्तांना वेगवेगळ्या मान्यवरांचे व्याख्यानाचा लाभ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे या बैठकीमध्ये अध्यक्ष इतर समितीमधील उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष कार्याध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख व सदस्य यांची नियुक्ती करण्यात आलेले आहे
या समितीमध्ये सार्वजनिक शिवजयंती शिवजल महोत्सव समिती 2025 च्या बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून तुषार देवराव जाधव पाटील कार्याध्यक्ष म्हणून बाळासाहेब प्रकाश भोसले उपाध्यक्ष म्हणून ऋषी कुमार वारे अ‌‌डवोकेट शेख मोहसीन करण दामोदर जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे.

प्रमुख मार्गदर्शक तन्हाजिराव भोसले सर रघुनाथ दादा सूर्यवंशी सुनील भाऊ काळे श्रीनिवास पोरजावार राजू दाद चापके तानाजीराव कदम काशिनाथ पाटील भोसले श्याम चव्हाण तानाजीराव निळकंठ राव लोंढे पाटील शंकरराव कदम प्रल्हादराव राखोंडे डॉक्टर साहेब यशवंतराव उबाळे साहेब संजय राखुंडे संजू पाटील भोसले आत्माराम दळवी सतीश महागावकर अलोक इंगोले दौलतराव हुंबार्ड नाथराव कदम दासराव कातोरे येलप्पा मिटकर सर हेमंत बेले आबासाहेब सावंडकर भगवानराव कावळे प्रभाकर दादा शिरसागर त्र्यंबक कदम पाटील रोडगेकर संभाजी बेले पाटील धामणगावकर सुभाषराव खराटे कवठेकर मंचकराव काळे डॉक्टर नागनाथ काळे एडवोकेट राजेंद्र दळवी देशमुख विष्णू जाधव गोरख पाटील तसेच प्राध्यापक नंदकुमार सवंडकर यांची सचिव शरद मुळे सहसचिव दीपक अशोकराव कदम सहसचिव चंद्रकांत लोंढे कोषाध्यक्ष श्री नामदेवराव दळवी प्रसिद्धी प्रमुख श्री पंजाबराव नवघरे प्रसिद्धीप्रमुख.आशिष मगर व विशाल शिंदे यांची सोशल मीडिया म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे धनराज कदम कोषाध्यक्ष त्याचबरोबर प्रसिद्धी मध्ये मारोतराव धोंडे शेख इस्माईल जहागीरदार संजय बर्दापुरे शेख इलास शेख याकूब दिनेश पालीमकर अशी नियुक्ती करण्यात आलेली आहे

समिती सदस्यांमध्ये अक्षय भोसले साईनाथ जाधव प्रभाकरराव तिडके गंगाधर हरणे बद्रीनाथ कदम ज्ञानराज कदम डॉक्टर संतोष देवरे डॉक्टर संतोष जाधव डॉक्टर शरद अडकिने विष्णू चव्हाण ज्ञानेश्वर सोळंके संदीप चव्हाण यीरा किड्स अनिल आगलावे जगन्नाथ जामगे शामराव चव्हाण बाळासाहेब भोसले एडवोकेट राजा कदम शंकर देवरे सचिन अडकिने देवराव राखुंडे संदेश अडकिने विलास खरबडे जयदीप जाधव रवी कुमार गिराम रावसाहेब काळे आलोक जाधव वैजनाथ कदम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .

वसमत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने यापूर्वी देखील बरेचसे वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे कुठलाही ढोल ताशा फटाकडे गुलाल किंवा मिरवणूक न करता विधायक मार्गाने शिवजयंती साजरी करण्यात येत असते पूर्वी जसे आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारांना मान्यवरांच्या हस्ते सत्यपाल महाराज व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी 15 हजाराची एफ डी 17 लोकांना देण्यात आली तसेच दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोसाच्या निमित्त राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे राज्यस्तरीय समाजाच्या सार्वजनिक कामांमध्ये हिताच्या काम करणारा मान्यवरांचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते याही वर्षी तशा पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे तसेच मागे मामा देशमुख सिंधुताई सपकाळ अशा अनेक मान्यवरांचे व्याख्यान हे शिवभक्तांना शिवजयंतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आता आपण यावर्षीच्या शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांचे व्याख्यान तसेच शिवछत्रपती पुरस्कार तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच महिलांसाठी कार्यक्रम तसेच समितीच्या वतीने सार्वजनिक विवाह सोहळ्याचे सुद्धा आयोजनाचा निश्चय केलेला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!