वसमत शहरातील नगर परिषदच्या विविध ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा तिन लक्ष रुपयांचा विमा काढण्यात शिवविकास सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संस्थने पुढाकार घेऊन काढला आहे, त्यामुळे कामगारांच्या भवितव्यासाठी हा एक सुरक्षा कवच असुन शिवविकास संस्थेने त्यांची दखल घेतली आहे.
शिवविकास संस्थेचे अध्यक्ष गंगाधर जोगदंड यांनी ३ लक्ष विमा कवच आम्ही कंत्राटी कामगारांना देणार आहोत असे काही दिवसांपूर्वीच सांगितले होते, त्यानुसार शिवविकास संस्थेच्या वतीने वसमत येथे नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार व मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांच्या हस्ते विमा संरक्षण पावती हि कामगारांना सुपूर्द करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या शिवविकास संस्थेने पुढाकार घेऊन कामगारां प्रति सदभावना दाखवल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी उपस्थित शिवसेना शहरप्रमुख काशिनाथ भोसले, नगरसेवक धनंजय गोरे,संस्थेचे अध्यक्ष गंगाधर जोगदंड, भुजबळे आण्णा आदी मान्यवर उपस्थित होते.