आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणदेश विदेश
लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवले टाकाऊ वस्तुपासून आकाश कंदील
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील दर्जेदार शैक्षणिक संस्था असलेल्या लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळीचे औचित्य साधून टाकाऊ व टिकाऊ साहित्य पासून सुंदर आणि देखणे असे आकाशकंदील बनवून शाळेचे प्रांगण लखलखीत करून टाकले आहे.
तसेच विद्यार्थ्यांनी पणती सजावट करून आपले कौशल्य सादर केले आहे यामध्ये त्यांना त्यांचे वर्गशिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे दरवर्षी लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिकू आनंदे या उपक्रमांतर्गत विद्यार्थी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते . यामध्ये मातीकाम कागदापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणे विद्यार्थ्यांची विज्ञान विषयातील रुची वाढवण्यासाठी प्रयोगाचा शनिवार ,गोष्टीचा रविवार विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी दररोज वाचनाचा तास असे वेगवेगळे उपक्रम ही शाळा राबविते आहे .
दिवाळी निमित्त शाळेत विद्यार्थ्यांना वेगवेगळी रंगीबेरंगी साहित्य वापरून सुंदर व आकर्षक आकाशकंदील व पणत्या ची सजावट केली त्यामुळे लालबहादूर शास्त्री विद्यालय आतील वातावरण आकाश कंदील लोकं त्याच्या प्रकाशामध्ये उजळून निघाले या उपक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी वृंद आदींनी मार्गदर्शन केले.