व्याख्याते सैंगराजदादा बिडकर (सातारा)
पंचकृष्ण यांना नमन करून प्रवचनाला सुरवात करण्यात आली. नंतर सत्संगाला सुरवात झाली.
आज महानुभवांची स्थानमहात्मे या प्रकरणावर निरूपण झाले.महानुभाव पंथाच्या पूर्वसूरींनी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या श्रीपदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणाची कशाप्रकारे शोधणी करून त्याचे संवर्धन केले याची माहिती दिली तसेच त्यात विशेष महत्वाचे जे स्थान आहे यांच्या लीळा निरूपण केल्या.तसेच अशा पवित्र स्थानाचा सहवास जर लाभला तर आपल्याला तेथे वंदन केल्याने परमेश्वराचे प्रेम,त्याची आवडी उत्पन्न होते असे निरूपण केले,या बरोबर श्रीचक्रधर स्वामींनी वऱ्हाड प्रांतातील श्रीक्षेत्र रुद्धपुर ची महती कशाप्रकारे वाखानली याचे महत्व आज त्यांनी सांगितले.या प्रकारे आज त्यांनी महानुभाव साहित्यातील भौगोलिक वाङ्मयाची माहिती विषद केली.
कार्यक्रम संयोजक – म . जायराजबाबा कपाटे सद्भावना फाउंडेशन