वसमत औंढा रोडवरील चोंढी टी पॉइंट जवळ पांगरा बोखारे इथून लग्न आटोपून व-हाडी घेऊन जाणारी क्रूजर गाडी व चोंढी स्टेशन येथे राहणारा शेख अजीम शेख सलीम याचे कोर्टापाटी जवळ टायर पंमचरचे दुकान आहे.या दुकानाकडे मोटरसायकल ने जात असताना क्रुझर आणि शाईन मोटरसायकलचा भीषण अपघात झाला .यामध्ये मेकॅनिक शेख अजीम शेख सलीम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याला नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली या घटनेची माहिती मिळताच कुरूंदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहने सुरळीत केले असून या अपघातात अजीम शेख सलीम यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत.