आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण
लाईफ बिजनेस कोच विनोद आनंद मेस्त्री यांचा वसमत येथे कार्यक्रम
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
मला शिवाजी व्हायचंय समस्या ते संधी आणि आय लिड मंत्र या पुस्तकाचे लेखक महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत 1200 हून अधिक व्याख्याने त्यांनी घेतली आहेत त्यातून दीड लाखांहून अधिक लोकांना त्यांनी मार्गदर्शन दिले आहे. शिवाजी महाराजांची तत्वे आणि त्यांचा आजच्या युगाची संबंध जोडून त्या विषयावर प्रेरणादायी आणि उद्बोधक व्याख्याने ते करत असतात.
आजपर्यंत मुंबई पोलीस दक्षिण विभाग ,मुंबई पोलीस समाजसेवा शाखा, महाराष्ट्र पोलीस अकादमी, पोलीस हेडकॉटर, महाराष्ट्रातील दहा पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये पंधरा हजाराहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे .एफ एम अस्मिता वाहिनी आणि bolmarathi.in वर त्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. 5 मार्च 2019 रोजी त्यांच्या कामाची दखल घेऊन गुजरात येथे लेखक आणि वक्ता म्हणून उत्तम कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरवण्यात आले आहे
तर भारतातील पहिला व्हाट्सअप लाइफ स्किल्स कोर्स लॉन्च करण्याचा मान त्यांना जातो..
असे अनमोल मार्गदर्शक विनोद आनंद मेस्त्री यांचा मार्गदर्शन आपल्या वसमत शहरात प्रथमच ऐकावयास मिळणार आहे निमित्त आहे लालबहादूर शास्त्री विद्यालय वसमत या शाळेच्या सकारात्मक पालकत्व व बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने ते वसमत येथे येणार असून वसमत शहरातील प्रसाद मंगल कार्यालय येथे दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांचं मार्गदर्शनाचा कार्यक्रम याठिकाणी होणार आहे तसेच लालबहादूर शास्त्री विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासाठी वसमत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, ग्रामीण पोलिस स्टेशनचे एपीआय विलास चवळी , तालुका आरोग्य अधिकारी अजय लोकडे, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य जी पी भराडे, वसमत शहर पोलीस स्टेशनच्या फौजदार प्रतिभाताई शेटे, या शाळेचे अध्यक्ष जगदीश चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
तरी सर्व पालक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान लालबहादूर शास्त्री शाळेच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण आणि प्रतिभा गोंगे यांनी केले आहे.