श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळ्यात
चौदावा दिवस
आज च्या सत्संगात भगवंतांची सेवा व त्या विषयी आवडी उत्पन्न होण्यासाठी काय करावे हे आज दादांनी निरुपणात सांगितले.शारीरिक, व मानसिक या दोन क्रियेने आपण आपण भगवंताच्या सेवेला प्राप्त होउ शकतो परंतु ती सेवा भगवंताने स्वीकारावी यासाठी मनुष्याच्या मनात दुःख असणे गरजेचे
आहे.शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे . परमार्थ हा समजुतीचा आहे स्वार्थ सुटताना पहिल्या -पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही . जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल . पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करुन शिवाय नि :स्वार्थी राहील . खरोखर , परमार्थ हे एक शास्त्र आहे ; त्यामध्ये सुसूत्रपणा आहे . व्यवहार न सोडावा ; पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते , म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे . भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे . भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ . असे आजच्या सत्रात निरूपण केले.
कार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन (बोरी)