जिजाऊ _ सावित्री महोत्सव सोहळा सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा उपक्रम शाळेत साजरा
वसमत / रामु चव्हाण
वसमत शहरातीलच नव्हे संपूर्ण जिल्हा आणि आता राज्यातही शैक्षणिक नवनवे प्रयोग करून जीवनाच्या कामी येणार शिक्षण देणारी आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करायला लागणारी शाळा म्हणजे लिटल की इंग्लिश स्कूल वसमत शहराचे वैभव आहे .
कोरोणाच्या काळात महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमाच्या दोन हजार शाळा बंद पडल्या असतानाही आपल्या विद्यार्थ्यांना बदलत्या काळाचे शिक्षण देणारी शाळा म्हणून आज उभी आहे .
असे मत वसमत येथील पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तान्हाजीराव भोसले यांनी व्यक्त केले
ते लिटल किंग्स इंग्लिश स्कूलच्या 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान आयोजित सावित्री जिजाऊ क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते .
सुरूवातीलाच शाळेच्या ज्ञानांजन परिसरात उभे असलेल्या सावित्री आणि जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु. सृष्टी नामदेव दळवी जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाला सुरूवात करून दिली.
वसमत येथील लीटल किंग इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या जिजाऊ सावित्री जन्मोत्सव सोहळा निमित्त ” सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा , सावित्री आणि जिजाऊंचा ” या अभिनव उपक्रमाचे आयोजन इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
3 जानेवारीपासून 12 जानेवारी पर्यंत विविध मैदानी खेळांचे आयोजन शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते . त्याचा बक्षीस वितरण समारंभ जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शाळेच्या मैदानावर कोरोणा चे सर्व नियम पाळत आयोजित करण्यात आला होता .
विविध खेळ प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विशेष प्राविण्य बद्दल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन पालकांसोबत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पुढे बोलताना ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी राव भोसले म्हणाले की मागील पंधरा वर्षाची परंपरा ” जिजाऊ सावित्री क्रीडा महोत्सव ” या शाळेने आयोजित केला हा उपक्रम येवढा प्रेरणादायी होता महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून महाराष्ट्रातील सगळ्या शाळेमध्ये ” जिजाऊ सावित्री जन्मोत्सव सोहळा ” मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा एक स्वतंत्र जीआर काढला . यावरून या शाळेने आयोजित केलेला जिजाऊ सावित्री जन्मोत्सव सोहळा किती पवित्र आणि भविष्याची दिशा देणारा होता हे आपल्या लक्षात येते .
शाळेतील सर्व पालकांनी कोरोणा च्या तिसऱ्या लाटेमध्ये ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देऊन मुलांना नवनवीन दिशा देण्याचे कार्य करावे व शासनाचे कोरोणा विषयक नियमांचे पालन करावे आणि शाळेतील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुला मुलींचे लसीकरण करून घ्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका मीना इंगोले , पालक प्रतिनिधी गजानन डरंगे. महिला पालक प्रतिनिधी जाधव ताई , पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी श्याम रावळे सर , शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी सर दैनिक सकाळचे प्रतिनिधी पंजाब पाटील नवघरे आणि पालक प्रतिनिधी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मराठी विभाग प्रमुख श्री सईम पिराजी सर तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी यांनी केले .