आपला जिल्हाराजकीय
युवासेनेची शहर व ग्रामीण कार्यकारिणी जाहीर- जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती
रामु.चव्हाण

युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यांची माहिती
वसमत / रामु चव्हाण
वसमत येथील शिवसेना युवासेना कार्यालय येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण करून शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरूण सरदेसाई युवासेना कार्यकारणी सदस्य सिद्धेश दादा कदम यांच्या आदेशाने हिंगोली जिल्हा युवासेना विस्तारक मा.श्री अभिषेक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैय्या बाहेती यांच्या नेतृत्वाखाली वसमत शहरातील तसेच ग्रामीण भागातील युवासेनेच्या विविध पदांकरिता नियुक्त्या करण्यात आल्या.
यामध्ये युवासेना उपतालुकप्रमुख पदी ज्ञानेश्वर काळे,गिरगाव सर्कलप्रमुख पदी देवानंद नादरे,गिरगाव सोशल मिडिया सर्कलप्रमुख पदी सचिन दाळपुसे, आसेगाव सोशल मिडिया सर्कलप्रमुख पदि विष्णू अडकीने याचप्रमाणे युवासेना कार्याध्यक्ष पदी करण नाकोड,शहर संघटक पदी गजानन सुपेकर,शहर सचिव पदी शिवकुमार येरगे,सुरज सरोदे शहर सहसचिव पदी बालाजी गिरी,उपशहरप्रमुख पदी अजय सिंग चव्हाण, राजू क्षिरसागर &सोशल मिडिया शहरप्रमुख बोधानंद हंबर्डे यांची निवड करून नियुक्ती पत्रक देण्यात आली ,यावेळी उपजिल्हाचिटणीस संदीप कातोरे,तालुकाप्रमुख संभाजी डाखोरे,युवासेना शहरप्रमुख धीरज कुल्थे,सर्कलप्रमुख जेंटी बेंडे, माणिक वारे,संभाजी मोरे,प्रवीण बोखारे,माधव दाळपुसे सह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.