वसमत शहरांमध्ये आज पेट्रोल पंप बंद होणार असल्याच्या अफवेने अक्षरश धुमाकूळ घातला असून शहरामध्ये कधी नव्हे तर चारही पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नसल्याच्या अफवा शहरात वार्यासारखी पसरली असून त्यामध्ये केवळ अफवा असून केवळ एका पेट्रोल पंपाच्या पेट्रोल संपल्याच्या चर्चेने संपूर्ण नागरिकांनी अक्षरशः पेट्रोल पंपावर गाड्यांच्या रांगाच्या रांगा लावून पेट्रोल भरून पेट्रोल पंपावरील पूर्ण स्टॉक संपवला असल्याची चर्चा शहरात पाहावयास मिळत असून अनेक पेट्रोल पंपाच्या संचालकाशी आणि प्रत्यक्ष जाऊन चर्चा केली असता अशी केवळ अफवा आहे. सकाळी पेट्रोल आणि डिझेल ची विक्री नियमित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.