दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी वसमत येथील नामांकित शाळा रेनबो इंग्लिश स्कूल येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्री. डिग्रसे, डॉ. श्रीमती डिग्रसे, डॉ.श्री. अग्रवाल हे उपस्थित होते. यावर्षीच्या JEE व NEET च्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविलेल्या कु. श्रेया गोटमवाड, किशन कुबडे, कु.निकिता कालुरे, शिवम जोगदंड, नागनाथ बेले, सागर संगेकर या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.श्री. डिग्रसे व डॉ. श्रीमती डिग्रसे
यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले तर
डॉ. श्री. अग्रवाल यांनी शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व शाळेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती
अग्रवाल तसेच श्रीमती देशमुख, श्रीमती गुद्धलवार, श्रीमती अलसटवार, श्रीमती मुळे, श्रीमती येरगटवार, श्रीमती साखरे ,श्रीमती भिसे, श्री.जाधव श्री.शिंदे आदींनी परिश्रम घेतले.