आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

वसमत तालुक्यातील ५ कोटीच्या रस्ते विकास कामाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आज उदघाटन

रामु चव्हाण

वसमत : रामू चव्हाण

      खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वसमत तालुक्यातील 5 कोटी 64 लक्ष रुपये खर्चाच्या रस्ते विकासाच्या कामाचा शुभारंभ खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये भोरीपगाव व कुरुंदा येथे पार पडणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या या रस्त्यामुळे वसमत तालुक्यातील भोरीपगाव,राजापूर,मार्लापूर किन्होळा, कुरुंदा,सुकळी, हि गावे आता पक्या रस्त्यानी जोडले जाणार आहेत . प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून ७ तालुक्यात ७० कोटीच्या वर कामाचे उदघाटन झाले असून आणखी ४ तालुक्यातहि हि कामे होणार आहेत .
या कार्यक्रमला खासदार हेमंत पाटील यांच्यासह आ. संतोष बांगर , आ. राजू नवघरे माजी जि. प. अध्यक्ष गणाजी बेले , माजी खासदार ऍड . शिवाजीराव माने,उपजिल्हाप्रमुख सुनील काळे,तालुका प्रमुख राजू चापके,माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार,विधानसभा संघटक संभाजी बेले,युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम,माजी तालुकाप्रमुख बालाजी तांबोळी,किसान सेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र सोळंके,उपतालुका प्रमुख विश्वनाथ दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे, युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती,शहरप्रमुख काशीनाथ भोसले, प.स.सदस्य रमेश कुबडे,प.स.सदस्य पंढरीनाथ क्षीरसागर, सर्कलप्रमुख माऊली चौरे,काशीनाथ दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे . प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते मजबूत करून शहरांशी जोडले जात आहेत . खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतल्यामुळे हिंगोली लोकसभा मदतरसंघातील हिंगोली, नांदेड, आणि यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे काम मंजूर करून घेतले असून त्याच कामाचा शुभारंभ १० एप्रिल रोजी करण्यात येत आहे . यामध्ये पहिल्या टप्यात नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील १६ कोटी ७५ लक्ष रुपयाच्या कामाचे उदघाटन होऊन कामाला सुरवात झाली. दुसऱ्या टप्यात हिंगोली , सेनगाव तालुक्यातील २८ कोटीच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. तर तिसऱ्या टप्यात वसमत तालुक्यातील ५ कोटी ६४ लक्ष रुपयाच्या कामाचे उदघाटन होणार असून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव, हिमायतनगर, उमरखेड,महागाव, हिंगोली , सेनगाव आणि वसमत या ७ तालुक्यात ७० कोटीच्या वर रस्ते विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे .
वसमत तालुक्यातील एमआरएल नॅशनल हायवे ६१ भोरीपगाव -राजापूर-मार्लापूर रस्त्यासाठी २ कोटी ८२ लक्ष रुपये तर टीओ ०५ ओडीआर ३७ किन्होळा – कुरुंदा ते सुकळी ते एमडीआर १३ पर्यंतच्या रस्त्यासाठी २ कोटी ८२ लक्ष असे एकूण ५ कोटी ६४ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत . याकामाचे उदघाटन भोरीपगाव आणि कुरुंदा येथे होणार आहे . रस्त्याच्या कामामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रमुख गावे आता पक्या रस्त्यानी शहरांशी जोडले जाणार आहे . दळणवळनाचा मार्ग सुकर होणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!