वसमत रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून आज डॉक्टर गंगाधर काळे यांनी पदभार स्वीकारला. वसमत उपजिल्हा रुग्णालय याचा कारभार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बालाजी चिलकेवार आल्यापासून ढिसाळला होता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चिलकेवार बाहेरगावाहून अप-डाऊन करत असल्याने रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर्स हेसुद्धा रुग्णालयात वेळेवर उपस्थित राहत नव्हते तसेच रूग्णालयातील मिळणारे औषधांचा तुटवडा रुग्णालयातील विजेचा प्रश्न यासह विविध कारणास्तव रुग्णालय नेहमीच चर्चेत राहत असे.
या रुग्णालयात अपुऱ्या मिळणाऱ्या सुविधा रुग्णांचे होणारे हाल यासंबंधी वेळोवेळी सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी यांनी आंदोलने केली मात्र वैद्यकीय अधीक्षक यांनी कोणालाही न जुमानता आपला कार्यकाळ काढण्याचा प्रयत्न केला .अखेर आज रुग्णालयात कार्यक्षम वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉक्टर गंगाधर काळे यांची वैद्यकीय अधीक्षक म्हणून प्रशासकीय बदली केल्याचे आदेश महाराष्ट्र आरोग्य विभागाने आज काढले असून त्यांनी वसमत उपजिल्हा रुग्णालयाचा पदभार स्वीकारला आहे तर डॉक्टर बालाजी चिलकेवार ऱ्यांची आखाडा बाळापूर येथे बदली करण्यात आली आहे. वसमत उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार बदलणार – वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे
डॉक्टर गंगाधर काळे यांनी आज वैद्यकीय अधीक्षक म्हणून उपजिल्हा रुग्णालय याचा कारभार स्वीकारला असून यावेळी त्यांनी वसमत सिटी न्यूज शी बोलताना सांगितले की उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभार आपण बदलणार असून रुग्णालयात रुग्णांना सर्व सोयीसुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून गरीब व गरजू रुग्णांना रुग्णालयाचा पुरेपूर फायदा मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच रुग्णालयातील औषधांचा तुटवडा स्वच्छता साफसफाई याकडे सुद्धा लक्ष देणार असून वसमत उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांना सर्व सोयीसुविधा या उपजिल्हा रुग्णालयात मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे यांनी सांगितले.