विद्यार्थी जीवनात संस्कार शिक्षण आणि खेळ याला अनन्य साधारण महत्व आहे , त्याशिवाय विद्यार्थी जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाला महत्त्व दिले पाहिजे आणि शाळेने संस्काराला महत्त्व दिले पाहिजे वसमत शहरातील लिटल किंग्ज ही शाळा संस्कार शिक्षण आणि खेळ याबरोबरच जगात चाललेल्या शिक्षणाची दखल घेत असते त्यामुळेच वसमत शहरात माझा पाल्य कोण्या शाळेत आहे तर वसमत शहरातील पालक अभिमानाने सांगतात माझा मुलगा लिटल किंग्ज शाळेत जातो असे अभिमानाने सांगतात.असे मत वसमत येथील प्रसिद्ध आरोग्य तज्ञ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. एम आर क्यातमवार यांनी काढले.
ते लिटल किंग्ज शाळेच्या सावित्री.. जिजाऊ क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भाषणात बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी, मुख्याध्यापक गोविंद दळवी क्रीडा शिक्षक संजय उबारे व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉक्टर की आता मार म्हणाले की कोरोना पार्श्वभूमी नंतर मोठ्या प्रमाणात आता आपण खेळाला आणि शरीराला व्यायामाला महत्त्व दिले पाहिजे रोज मेडिटेशन योगा आणि खेळ खेळले पाहिजे तरच भविष्यात आपले शरीर साथ देईल, अभ्यासाबरोबरच जीवनात खेळाला महत्व देऊन आपले आरोग्य मजबूत केले पाहिजे असे ते म्हणाले.
लिटल किंग्ज शाळेत दरवर्षी 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती ते 12 जानेवारी जिजाऊ जयंती दरम्यान क्रिडा महोत्सव साजरा करण्यात येतो.
यादरम्यान शाळेत रोज विवीध क्रिडा स्पर्धा आयोजीत केल्या जातात.
दहा दिवस दप्तर मुक्त शाळा आयोजीत केलेली असते.
या वर्षी संगीत खुर्ची, धावणे, उंच उडी, लांब उडी, खो खो, कबड्डी, बॉल बॅडमिंटन, तिन पायी उडी, फॅन्सी ड्रेस, सायकलिंग, रॉकेटबॉल आणि आनंद नगरी आणि शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण अशा भरगच्च स्पर्धेचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात येत असते.