
वसमत/ रामु चव्हाण
वसमत येथील प्रतिष्ठित नागरिक तथा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू यांच्या घरासमोरील पार्किंगमध्ये उभे केलेले कार क्रमांक एम एच 38 v 6777 या कारला दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अंदाजे साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञाताने पेटवली यावेळी सुभाष लालपोतू यांचा मुलगा सागर लालपोतू हे घरावर लावलेली लाइटिंग बंद करण्यासाठी उठले असता त्यांना पार्किंग मध्ये काहीतरी जळत असल्याचे दिसली .यावेळी त्यांनी ताबडतोब खाली येऊन पाहिले असता कारच्या समोरील बाजूने पेट घेतलेला दिसला यावेळेस त्यांनी आरडाओरड करून घरातील इतर लोकांना बोलून पाणी टाकून आग विझवली . गाडीचे पुढील भागाचे नुकसान झाले असून मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये घरासमोरील पार्किंगमध्ये उभी असलेली कार कोणीतरी अज्ञाताने पेटवली असल्याची तक्रार सागर सुभाष लालपोतू यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात दिली आहे सदरील अज्ञात व्यक्ती हा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सदरील इसमास कोणी ओळखत असल्यास वसमत शहर पोलीस स्टेशन किंवा सागर लालपोतू यांच्या फोनवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .मोबाईल क्रमांक सागर सुभाष लालपोतू 98 23 26 82 67 यावर संपर्क साधावा…