वसमत/ रामु चव्हाण वसमत शहरामध्ये मी वसमतकर या सामाजिक संस्थेच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले असून याबरोबरच वसमत शहरातील मानाचे गणपती आहेत यांच्यामध्ये देखावे ( झाकी ) करणाऱ्या गणेश मंडळांना बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहेत .
तसेच श्री महालक्ष्मी सजावट स्पर्धेमध्ये सुद्धा विजेत्या स्पर्धकांना बक्षीस व भेटवस्तू मानाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे त्यामुळे आपणही या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस मिळण्याची ही सुवर्णसंधी असल्याने आपण या स्पर्धेत भाग घेऊ शकता मग विचार कसला करताय उचला फोन आणि करा नोंदणी.