आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
17 सप्टेंबर रोजी नांदेडला देवेंद्र फडणवीस तर हिंगोलीत सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते ध्वजारोहण
रामु चव्हाण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त नांदेड येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर हिंगोली येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण
वसमत/ रामु चव्हाण
मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगर विभागीय मुख्य कार्यालय तसेच नांदेड, परभणी, हिंगोली ,लातूर, परभणी ,बीड ,उस्मानाबाद ,जालना या जिल्ह्यांमध्ये शासकीय ध्वजारोहण करण्याकरिता विविध मंत्र्यांकडे जिल्ह्यांचा प्रभार ध्वजारोहणाकरिता देण्यात आला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजी नगर येथे ध्वजारोहण करतील, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदेड येथे ध्वजारोहण करतील ,हिंगोली जिल्ह्यासाठी सुधीर मुनगंटीवार, लातूर जिल्ह्यासाठी सुरेश खाडे ,परभणी जिल्ह्यासाठी अतुल सावे, बीड जिल्ह्यासाठी संदिपान भुमरे, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी तानाजी सावंत ,आणि जालना जिल्ह्यासाठी अब्दुल सत्तार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याचे परिपत्रक शासनाने आज काढले असून येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मंत्रीमहोदयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.