अनेकजण आपल्या मुलाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करून अनाठाई खर्च करून पैशाची उधळपट्टी करत असतात पण समाजांमध्ये अशीही काही दानशूर व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत अनाठायी खर्चाला फाटा देत या खर्चातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी येथील शिक्षिका संगीता नेमाडे ( सौ संगिता सुभाषराव भास्कळ) यांचा मुलगा सर्वेश ह्याच्या तिसरा वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप यावेळी करण्यात आले यावेळी चिरंजीव सर्वेश, श्री सुभाषराव भास्कळ, सौ संगीता नेमाडे (भास्कळ) यांच्यासह शिक्षक कर्मचारी वृंद विद्यार्थी उपस्थित होते.