आजपासून खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
कयाधू-पैनगंगा महोत्सव समिती अंतर्गत ६ विधानसभा क्षेत्रात होणार स्पर्धा
वसमतमधून वक्तृत्व स्पर्धेला सुरवात; विजेत्यांना दिल्ली दौऱ्याची संधी
वसमत / रामु चव्हाण
ः हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कयाधू-पैनगंगा महोत्सव समिती अंतर्गत विधानसभा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार १८ ते २३ डिसेंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात आजपासून वसमत विधानसभा क्षेत्रापासून होत आहे.
खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी सुद्धा अश्याच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघात करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना दिल्ली येथील देशाचे सर्वोच्च सदन संसद व राष्ट्रपती भवन भेट आणि इतर महत्वाच्या शैक्षणिक संस्था दाखविण्यात आल्या होत्या. यंदाही अश्याच प्रकारच्या दिल्ली अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर यंदाही वसमत येथून या स्पर्धेला सुरवात होत आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वसमत शिवसेना तालुकाप्रमुख राजु चापके, माजी नगराध्यक्ष शिवदास बोडेवार, बाराशिव हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष प्रा. बी. डी. कदम भाजप महिला आघाडीच्या अज्वला तांभाळे, मार्केट कमिटीचे संचालक राजेश इंगोले, विधानसभा संघटक मच्छिंदर सोळंके, माजी उपनराध्यक्ष सिताराम मॅनेवार, डॉ. अवधूत शिंदे, माजी सभापती रामकिशन झुंझुर्डे, शहर प्रमुख प्रभाकर क्षिरसागर, मार्केट कमेटिचे संचालक खोब्राजी नरवाडे,मनोज चव्हाण, बाबा आफुने, उपस्थिती पाहणार आहे.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी संत नामदेव : भारत जोडणारा दुवा, स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे साहेबांचे विचार जपणारा लोकनेता : एकनाथरावजी शिंदे साहेब, संस्कारक्षम युवक काळाची गरज, बदलती वाचन संस्कृती बुक ते ई-बुक, हिंगोली लोकसभा मतदारसंघ विकासासाठीचा दीपस्तंभ : हळद संशोधन केंद्र आणि लिगो प्रकल्प, समाजभान जपणारा नेता: खासदार हेमंत पाटील साहेब आणि समृद्ध शेतीची गुरुकिल्ली संशोधन आणि जलसिंचन असे ७ विषय असणार आहेत.
स्पर्धेत १६ ते २८ वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून, त्यांना विचार मांडण्यासाठी किमान ५ आणि जास्तीत जास्त ७ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क खासदार हेमंत पाटील यांचे वसमत विधानसभा क्षेत्राचे जनसंपर्क अधिकारी चक्रधर खराटे ( ८३७८८२११११) यांच्याशी संपर्क साधावा आयोजक : कयाधू-पैनगंगा महोत्सव समिती, हिंगोली लोकसभा यांच्याशी संपर्क साधावा असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.