
मराठा आंदोलनासाठी सोमवारी हिंगोली जिल्हा बंद
*वसमत बाजारपेठ दिवसभर कडकडीत रहाणार बंद*
वसमत/
जालना जिल्ह्य़ातील अंतरवाला सराटी येथे मराठा समाजावर झालेल्या भ्याड लाठीमाराचा निषेधार्थ सोमवारी 4 सप्टेंबर 2023 रोजी हिंगोली जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय आज झाला.
वसमत शहरात शिवतीर्थ वर झालेल्या बैठकीत निर्णय होऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.