पोलिस दलात उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल पोलिस वसमत शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोमवारी या बाबत घोषणा केली पोउनि साहेबराव कसबेवाड यांना मिळालेल्या सन्मानचिन्हा बदल पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर , पोलीस निरीक्षक सुधीर वाघ,सपोनी गजानन बोराटे ग्रामीण ,सपोनी रामदास निरदोडे कुरूंदा,पोउनि शिवाजी बोंडले,एकनाथ डक ,संतोष मुपडे ,महाजन व सर्व पोलिस कर्मचारी ,पत्रकार यांनी अभिनंदन केले.