आपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
ठाकरे गटाची वसमत शहरात निघणार मशाल रॅली- शहर प्रमुख काशिनाथ भोसले
रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नुकतेच नाव ठाकरे गटाला मिळाले असून निष्ठावंतांची मशाल रॅली ही वसमत शहरामध्ये काढण्यात येत असून या निष्ठावंत मशाल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख काशिनाथ भोसले यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेचे ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर निवडणूक निशाणी मशाल मिळाली आहे त्यामुळे हीच खरी शिवसेना व निष्ठावांतांचे शिवसेना असल्याने निष्ठावंतांची मशाल रॅलीचे आयोजन वसमत शहरांमध्ये करण्यात आले आहे त्यामुळे दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता वसमत शहरातील ठक्कर कॉम्प्लेक्स येथून सदरील निष्ठावंतांची मशाल रॅली काढण्यात येणार आहे सदरील मशाल रॅली ठक्कर कॉम्प्लेक्स – शहर पोलीस स्टेशन – झेंडा चौक – मामा चौक – मोंढा – नगरपरिषद कॉम्प्लेक्स आणि शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा या ठिकाणी पोहोचणार असून या निष्ठावंतांची मशाल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान शिवसेना शहर प्रमुख काशिनाथ भोसले यांनी केले आहे.