हिंगोली जिल्ह्यातील नावलौकिक असलेल्या शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या निवडणूक साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आज दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर केवळ 15 उमेदवारांचे अर्जच शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड करण्यात आली.
शिवेश्वर बँकेचे विद्यमान चेअरमन शिवदास बोड्डेवार यांच्या नेतृत्वाखाली बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कसून प्रयत्न करत सर्व पंधराच्या पंधरा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यामागे शिवदास बोड्डेवार यांची मोठे भूमिका असून आज दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 15 अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम मुसिंगे यांनी जाहीर केले. यामध्ये निवड झालेल्या संचालकांमध्ये शिवदास बोडेवार ,नागनाथ कोमलवार,डाॅ धोंडीराम पार्डीकर, बालाजी माळवदकर ,बालासाहेब जाधव, विनोदकुमार झंवर ,शेख मोईनोद्दीन शेख संदलजी, दत्तात्रय दलाल ,लक्ष्मीकांत कोसलगे, भारत नामपल्ली ,राधाकृष्ण साबणे, शकुंतलाबाई देवणे, रूपाली दगडू, नारायण लासिनकर ,वसंत चेपुरवार असे 15 संचालकेश्वर बँकेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. नवीन संचालकांचा शिवेश्वर बँकेचे कर्मचारी अधिकारी नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.