वसमत येथील श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी हाफेज शादाब सिद्दीकी व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी राजु सिद्दीकी यांचा मुलगा याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली
वसमत येथील शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेले महाविद्यालय श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयाचा विद्यार्थी हाफेज शादाब सिद्दीकी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी राजु सिद्दीकी यांचा मुलगा याची All India National T20 क्रिकेट चॅम्पियन लेदर बॉल 19 वर्षांखालील “गोवा गोल्ड कप 2022
गोवा येथे दि 14 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
आज रोजी औरंगाबाद येथून महाराष्ट्र संघ गोवा साठी रवाना होत आहे. श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र संघात निवड झाल्याने महाविद्यालया साठी ही अभिमानाची गोष्ट आहे
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेशसा कमळू, सौ आरती गणेश कमळू,अरुण कमळू गौरव कमळू तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे