वसमत शहरात 8 मेच्या सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जावयाने घरगुती कारणावरून सासूचा डोके जमिनीवर आपटून खून केल्याची घटना शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की वसमत शहरातील झेंडा चौक परिसरात राहणाऱ्या शेवंताबाई होणाजी वंजे वय 75 वर्ष यांचे आणि जावई बाबासाहेब शिंगारे राहणार श्रीरामपूर यांच्यासोबत सोमवार दिनांक आठ मे च्या सकाळी पाच वाजता सुमारास वाद झाला या वादाचे पर्यावरण हाणामारीत झाले यावेळेस जावई बाबासाहेब शिंगारे यांनी सासू शेवंताबाई वंजे यांचे डोके जमिनीवर जोरात आदळे यात सासु शेवंताबाई यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शहर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, जमादार गजानन भोपे ,प्रशांत मुंडे, कृष्णा चव्हाण, भगीरथ सवंडकर यांनी भेट देऊन पंचनामा केला असता सदरील जावयास पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पुढील तपास वसमत शहर पोलीस करत आहे.