श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळ्यात
दहावा दिवस
आज सत्संगात जीवमात्राचा उद्धार ज्या ज्ञानाने होतो त्या ज्ञानाचे निरूपण केले.आणि ज्ञानाची सुरवात ज्यांच्यापासून झाली असे परब्रम्ह परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभू यांची महती सांगितली, तसेच परमेश्वर आपल्याला एखादी गोष्ट प्रदान करतात त्या वेळी मनुष्याला स्वार्थ हा बाजूला ठेवायला सांगतात परंतु मनुष्य ते ईश्वराचे म्हणणे न एकता स्वतःचा स्वार्थ बघतो आणि अधोगतीला जातो असे निरूपण करून परब्रम्ह परमेश्वर श्रीदत्तात्रेय प्रभू व सहस्त्रअर्जुन यांची लीळा बोधपर सांगून देवाने सांगितलेले नियम कसे पाळायचे याचे मार्गदर्शन केले.तसेच श्री दत्तात्रय प्रभू यांच्या अवतार कार्याचा हेतू सांगून आजचे दहावे सत्र
संपन्न झाले
कार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन (बोरी)