श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळ्यात
अकरावा दिवस
आज सत्संगात देवाचे देऊळ या विषयावर चिंतन मार्गदर्शन झाले, तसेच यादवकालीन येणाऱ्या मंदिरांची माहिती व त्याकाळी जनसामान्यांची आराध्यदैवताबद्दल असलेली श्रद्धा यावर निरूपण केले.मनुष्याचे हित ,लाभ कश्यात आहे व कोणत्या गोष्टीने मनुष्याचे अहित होते या विषयावर बोधप्रद कथा सांगून आजच्या सत्संगाची सांगता झाली.
कार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन (बोरी)