ग्लोबल आडगाव या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात निवड
रामु चव्हाण

वसमत/
🎭 ग्लोबल आडगाव या बहुचर्चित मराठी चित्रपटाची “” कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात निवड :-
🎞️ या आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात आलेल्या 3000 चित्रपटातुन 14 भारतीय चित्रपट निवडले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातून केवळ “” ग्लोबल आडगाव “” या मराठी चित्रपटांची निवड :-
📽️ ग्लोबल आडगावच्या माध्यमातून “” सागर पतंगे “” यांची सिनेसृष्टीत गगनभरारी :-
▪️सिल्व्हओक फिल्म्स & इंटरटेंनटमेंट प्रस्तुत, मनोज कदम निर्मित, अनिलकुमार साळवे लिखित व दिगदर्शीत मराठी चित्रपट “” ग्लोबल आडगाव “” ची निवड कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात झाली आहे.
🎭 दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या मोहत्सवात ” ग्लोबल आडगाव ” या चित्रपटाचे सादरीकरण हे 20 डिसेंबर रोजी प.बंगाल सेंटर, कोलकता येथे होणार आहे.
🎞️हा चित्रपट मोहत्सव पश्चिम बंगाल राज्यशासनाच्या वतीने घेण्यात येतो व या चित्रपट मोहत्सवास अमिताभ बच्चन, शत्रूघन सिन्हा, शाहरुख खान यांची उपस्थिती राहणार आहे.
▪️ग्लोबल आडगाव म्हणजे शेती, मातीतल्या पिढ्यांची जीवघेणी घुसमट आहे. बेरकी व्यवस्थेच्या भिंतींना तडा देणारा क्रांतीचा संघर्ष म्हणजेच “” ग्लोबल आडगाव “” चित्रपट आहे.
▪️या चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे, अनिल नगरकर, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अशोक कानगुडे, महेंद्र खिलारे, शिवकांता सुतार, विष्णू भारती, विष्णू चौधरी, नाना कर्डिले हे कलाकार वर्ग आहेत.
▪️सदरील चित्रपटाचे इ.पी-प्रशांत जठार, प्रोडक्शन मॅनेजर – सागर पतंगे ( देशमुख ), छायांकन – गिरीश जांभळीकर, ध्वनी – विकास खंदारे, कला दिग्दर्शक – संदीप इनामके हे आहेत.